उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा, लोकांचे तर्क-वितर्क काय?
राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर सोशल मिडियावर याचीच चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणताय सुप्रीम कोर्टाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फिरवला तर राहुल नार्वेकर म्हणताय मी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं व्यवस्थित पालन केलंय.
मुंबई, १८ जानेवारी २०२४ : राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाची महापत्रकार परिषद झाली त्यानंतर लोकांनी या दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून अनेक तर्क वितर्क लावलेत. सोशल मिडियावर याचीच चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणताय सुप्रीम कोर्टाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फिरवला तर राहुल नार्वेकर म्हणताय मी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं व्यवस्थित पालन केलंय. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर ठरवली तर निकाल देताना नार्वेकर प्रतोद म्हणून गोगावलेंची निवड कायदेशीर असल्याचे म्हटले. यावरून ठाकरे म्हणताय कोर्टाचा निर्णय सरळपणे बदलला गेलाय. तर गोगावले यांची निवड कायमस्वरूपी अवैध आहे असं कोर्टाने म्हटलंच नाही. त्यामुळे कायमस्वरूपी या शब्दाचा आधार घेत गोगावले यांना पुन्हा प्रतोद म्हणून निवडले. कोणताही निकाल देताना शब्द, नोंदी, उल्लेख आणि तांत्रिक मुद्दे का महत्त्वाचे? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट