भाऊ की भाई? एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन सोशल वॉर?
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरनंतर आता सोशल मीडियावर श्रेयाचं वॉर रंगलं आहे. एन्काऊंटरच्या समर्थनात आणि विरोधात नेटकरी प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी या दोन्ही नेत्यांची बंदुकीसोबतचे फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केलं असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र प्रकरणाच्या न्यायनिवाड्यापूर्वीच आरोपीला मारून सरकारने संस्था चालकाला वाचवलंय का? अशी शंका विरोधकांनी केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी आरोपीच्या एन्काऊंटरवरून आपापल्या नेत्यांना श्रेय देण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे. एकीकडे शिंदे-फडणवीसांनी दावा केल्याप्रमाणे पोलिसांना स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळ्या झाडाव्या लागल्या पण फडणवीसांचे समर्थक म्हणताय., लाडक्या बहिणीसाठी तो अपराध्यांना तोडतो ही आणि ठोकतो ही.. सिंघम देवा भाऊ तर शिंदे समर्थकांनी आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा असा हा धर्मवीर म्हणत पोस्टर शेअर केलेत. फडणवीस समर्थक म्हणताय यूपीमध्ये जसा योगी पॅटर्न तसा महाराष्ट्रात फडणवीस पॅटर्न… तर शिंदे समर्थक म्हणताय महाराष्ट्राला आता स्वतःच योगी मिळालेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट