Anna Hazare | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुटीन चेकपसाठी रुबी रुग्णालयात दाखल

| Updated on: Nov 25, 2021 | 7:23 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुटीन चेकअपसाठी पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अण्णांना कुठलाही त्रास होत नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रुबी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने अण्णांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. दर तीन महिन्यांनी अण्णा हजारे यांची रुटीन तपासणी केली जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे अण्णांनी रुटीन तपासून मागील वर्षभरापासून केली नव्हती.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुटीन चेकअपसाठी पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अण्णांना कुठलाही त्रास होत नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रुबी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने अण्णांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. दर तीन महिन्यांनी अण्णा हजारे यांची रुटीन तपासणी केली जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे अण्णांनी रुटीन तपासून मागील वर्षभरापासून केली नव्हती. त्यामुळे अण्णा आज रुबी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

Raju Shetti | शेतकरी चळवळ वेगळी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन वेगळे : राजू शेट्टी
ED सारख्या संस्था राजकीय कार्यकर्त्यांसारखे वागताहेत, Raju Shetti यांचा हल्लाबोल