Sangli | जयंत पाटलांविरोधात भाजप आक्रमक, सांगलीमध्ये ‘पालकमंत्री हटाव’ आंदोलन
भाजपतर्फे आज सांगलीच्या टिळक चौकात पालकमंत्री हटाव आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना भरीव अशी मदत दिली गेली नाही. तसेच कोरोनाला हाताळण्यात पालकमंत्री अपय़शी ठरले आहेत. यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.
सांगली : भाजपतर्फे आज सांगलीच्या टिळक चौकात पालकमंत्री हटाव आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना भरीव अशी मदत दिली गेली नाही. तसेच कोरोनाला हाताळण्यात पालकमंत्री अपय़शी ठरले आहेत. यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.
सांगली जिल्ह्यात पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी पूर आला. अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. छोटे मोठे व्यापारी, शेतकरी, नागरिक यांचे नुकसान झाले. पण या पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाविकास आघाडी कडून दिली गेली नाही. तसेच सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे अपयशी ठरले आहेत, असा आरोप भाजपने केला. तसेच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली.