Video : पालिका निवडणुकीआधी पक्षांतर, एमआयएमचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार

| Updated on: Aug 12, 2022 | 11:38 AM

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला (mim) मोठं खिंडार पडलं आहे. सोलापुरातील एमआयएमचे सहा नगरसेवक आज राष्ट्रवादीमध्ये (ncp) प्रवेश करणार आहेत. एमआयएमचे नेते, नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वात सहा नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा हा प्रवेश सोहळा होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात […]

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला (mim) मोठं खिंडार पडलं आहे. सोलापुरातील एमआयएमचे सहा नगरसेवक आज राष्ट्रवादीमध्ये (ncp) प्रवेश करणार आहेत. एमआयएमचे नेते, नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वात सहा नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा हा प्रवेश सोहळा होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे तौफिक शेख हे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचे प्रतिस्पर्धक आहेत. त्यामुळे शेख यांना पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीने एमआयएमला खिंडार पाडतानाच काँग्रेसलाही शह दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेस आता राष्ट्रवादीच्या या खेळीला कसे उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

Published on: Aug 12, 2022 11:38 AM
Video : दोन दिवसात खातेवाटप जाहीर होईल- विजयकुमार गावित
BGMI : बॅन होण्याआधी BGMI गेमला 10 कोटींहून अधिक भारतीयांनी Download केलं, कंपनीची भरघोस कमाई