धक्कादायक… डॉक्टर पतीकडूनच डॉक्टर पत्नीचा छळ, अखेर उचललं टोकाचं पाऊल

| Updated on: Jun 11, 2024 | 4:14 PM

MRI मशीन विकत घेण्यासाठी डॉक्टर सूरज रूपनर याच्याकडून पत्नी डॉक्टर ऋचा रूपनर यांचा छळ करण्यात येत होता. सातत्याने डॉक्टर सूरज रूपनर याच्याकडून होणाऱ्या छळ, त्रासाला कंटाळून डॉक्टर ऋचा रूपनर यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सोलापूर जिल्हयामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर असणाऱ्या पत्नीनेच स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. MRI मशीन विकत घेण्यासाठी डॉक्टर सूरज रूपनर याच्याकडून पत्नी डॉक्टर ऋचा रूपनर यांचा छळ करण्यात येत होता. सातत्याने डॉक्टर सूरज रूपनर याच्याकडून होणाऱ्या छळ, त्रासाला कंटाळून डॉक्टर ऋचा रूपनर यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर सध्या सांगोला पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर ग्रामीण यांच्याकडून या घटनेचा अधिक तपास करत आहे.

Published on: Jun 11, 2024 04:14 PM
Baramati Assembly : विधानसभेलाही पवार vs पवार? नणंद-भावजयीच्या लढतीनंतर आता काका-पुतण्यामध्ये लढत? कोणाला उमेदवारी?
Sadabhau Khot on BJP : मला मंत्री करा अन्यथा… सदाभाऊ खोत यांचा भाजपला सूचक इशारा