Solapur Lockdown | सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत 13 ऑगस्टपासून कडक निर्बंध

| Updated on: Aug 09, 2021 | 8:29 AM

सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे कोरोना निर्बंधांबाबतच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीही या तालुक्यांचा उल्लेख करत कोरोना वाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं रात्री हा आदेश काढला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात काय सुरु, काय बंद?

सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कडक निर्बंध
13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरु राहणार आहेत.
अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकानं पूर्णपणे बंद असतील
मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असेल
विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी असेल
अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी लागू
खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार

Published on: Aug 09, 2021 08:29 AM
Hyderabad | हैद्राबादमध्ये भरधाव बाईकचा अपघात, चालकाचा मृत्यू
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 9 August 2021