‘ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे …’, उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका
देशातील सगळे प्रश्न संपले आहेत आणि महाराष्ट्रात फक्त शिवसेना हाच आपला दुश्मन आहे. या टरबूजाचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे? ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं. पण हे दुष्काळात तेरावा महिना आहे. हे टरबूज नाहीतर... बघा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर काय केला हल्लाबोल?
सोलापुरात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची काल सोलापुरात जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस आता पाव उपमुख्यमंत्री झाले आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे पुढे असेही म्हणाले, ‘देशातील सगळे प्रश्न संपले आहेत आणि महाराष्ट्रात फक्त शिवसेना हाच आपला दुश्मन आहे. या टरबूजाचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे? ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं. पण हे दुष्काळात तेरावा महिना आहे. हे टरबूज नाहीतर दिवाळी आपण पायाखाली चिरडतो ते चिराट आहे.’, असा घणाघात ठाकरेंनी फडणवीसांवर केला. आले तेव्हा टरबूज होते आता पाव मुख्यमंत्री झालेत म्हणजे चिराट झालेत. बघा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर काय केला हल्लाबोल?