वोट करायला मतदान केंद्रावर पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?

| Updated on: May 07, 2024 | 5:00 PM

आज देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदार पार पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एका मतदार केंद्रावर हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित तरूणाला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

सांगोला तालुक्यात मतदाराकडून मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एका मतदार केंद्रावर हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित तरूणाला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हा प्रकार करणाऱ्या संबंधित तरूणाकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात येत होत्या. इतकंच नाहीतर मतदार केंद्रावर ठेवण्यात आलेल्या मतदान मशीन बोगस असल्याचा आरोपही त्या तरूणाने केला. यावेळी तरूणाने मतदानाच्या मशीनवर पेट्रोल टाकून त्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांनी वेळेच धाव घेत हा धक्कादायक प्रकार रोखला आणि त्या तरूणाला पोलिसांच्या हवाले केले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदार पार पडत आहे. राज्यातील ११ जागांवर मतदान प्रक्रिया सुरू असताना कुठे उत्साह तर कुठे शुकशुकाट दिसतोय.

Published on: May 07, 2024 05:00 PM
तो कार्यकर्ता चुकला, मी तिथे गेलो नसतो तर… शिवीगाळचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता…, मोदींचा काँग्रेस अन् इंडिया आघाडीवर हल्लाबोल