सोलापुरात प्रणिती शिंदे वि. रोहित पवार लढाई, कारवाई मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर; पाहा…
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निदर्शनं केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाहा...
सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निदर्शनं केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी युवकचे नेते आक्रमक झाले. त्यांनी प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांचा पुढाकार होता. प्रशांत बाबर हे रोहित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत बाबर यांना प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणं महागात पडलंय. आता प्रशांत बाबर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Published on: Feb 12, 2023 08:50 AM