पंढरपुरात उजनीच्या कालव्याला मोठी गळती, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

| Updated on: May 01, 2023 | 2:27 PM

VIDEO | माळशिरस तालुक्यातील संगम गावाजवळ उजनी कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती, कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यानं मोठं नुकसान

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील संगम गावाजवळ उजनी कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याचे समोर आले आहे. कालव्याला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी वाया जात आहे. दरम्यान हे पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती पिकांमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. उजनीच्या कालव्याला गळती लागल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. हे पाणी माळशिरस ,पंढरपूर , मंगळवेढा या तालुक्याला शेतीसाठी आणि पिण्यासाठी पुरविले जाते. माळशिरस तालुक्यातील संगम या ठिकाणी हा कॅनल फुटल्याने मंगळवेढा या ठिकाणी पाणी पुरविले जाऊ शकत नाही, त्यामुळे तत्काळ कॅनल दुरुस्त करून मंगळवेढा येथील शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

 

 

Published on: May 01, 2023 02:27 PM
अयोध्या पौळ यांनी बांगर यांना करून दिली ‘त्या’ चॅलेंजची आठवण..; काय आहे पहा चँलेज आणि काय आणलं पहा गिफ्ट
अवकाळीने शेतकरी बेजार, पावसानं पिकांचं मोठं नुकसान बळीराजा हवालदिल