सोलापुरातील ‘या’ परिसरात संचारबंदीचे आदेश, कलम 144 लागू; काय आहे कारण?
VIDEO | सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची तयारी अंतिम टप्प्यात सुरु
सोलापूर : सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. साखर कारखान्यापासून एक किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहेत. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या आवारात अत्यावश्यक सेवा वगळता संचार करण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. काल संध्याकाळी चार वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार, 13 ते 18 जूनपर्यंत सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनास बंदी असेल.तर कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टोरंट, बार, हॉटेल, धार्मिक स्थळ, प्रार्थना स्थळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Published on: Jun 14, 2023 07:57 AM