रस्त्यावर पोपट घेऊन बसणाऱ्यांना भविष्य सांगू द्या, त्यांचा रोजगार का हिरावताय? भाजपच्या नेत्याची शरद पवार यांच्यावर टीका

| Updated on: Mar 05, 2023 | 7:46 AM

Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच महाविकास आघाडीवरही टीका केली आहे. पाहा...

सोलापूर : भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. रस्त्यावर पोपट घेऊन जे भविष्यवाणीसाठी बसतात त्यांची उपासमार का करताय? त्यांना भविष्य सांगू द्या. शरद पवार का त्या रांगेत जाऊन बसत आहेत?, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र इतर पुढाऱ्यांप्रमाणे ते स्वप्नरंजन करत आहेत. त्यांच्या यादीत शरद पवार पण सामील झाले, हे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या जास्त होत चालली आहे, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.

Published on: Mar 05, 2023 07:43 AM
धर्म म्हणजे पूजा नव्हे तर धर्म म्हणजे…; मोहन भागवत यांनी अर्थ उलगडून सांगितला…
नागालँडमधील विजयाने शरद पवार आनंदी असतीलही पण महाराष्ट्रात असाच निकाल लागणार नाही; कुणाचं टीकास्त्र?