EDचे काही अधिकारी जेलमध्ये जाण्याची शक्यता - Sanjay Raut

‘EDचे काही अधिकारी जेलमध्ये जाण्याची शक्यता’ – Sanjay Raut

| Updated on: Mar 08, 2022 | 9:01 PM

ईडी हे सारे भाजपच्या काही नेत्यांच्या संगनमताने करत असून, त्यातून खोऱ्याने पैसा गोळा करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप यावेळी राऊत यांनी केला. तसेच येणाऱ्या काळात ईडीसोबतच्या त्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईः ईडी (ED) आणि त्यांचे काही अधिकारी भाजपची (BJP) एटीएम मशीन झाले आहेत. माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत, अशी घोषणा शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. विशेष म्हणजे राऊत यांनी यावेळी या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती दिली. ईडी हे सारे भाजपच्या काही नेत्यांच्या संगनमताने करत असून, त्यातून खोऱ्याने पैसा गोळा करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप यावेळी राऊत यांनी केला. तसेच येणाऱ्या काळात ईडीसोबतच्या त्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

ED चे अधिकारी BJP ची ATM मशीन, Sanjay Raut यांचा धक्कादायक आरोप
‘कितीही ताकद लावा, आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत’, राऊतांचं थेट आव्हान