“मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव, कुणीतरी बॅक सीटवरून ड्राइव्हिंग करतंय”; पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे, असं ते म्हणाले. कुणीतरी बॅक सीटवरून ड्राइव्हिंग करतंय, असंही ते म्हणाले.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे, असं ते म्हणाले. कुणीतरी बॅक सीटवरून ड्राइव्हिंग करतंय, असंही ते म्हणाले. “एकनाथ शिंदे यांच्याकडे आधी नगरविकास खातं होतं आणि आता सत्ताबदल झाल्यानंतरही त्यांच्याकडे तेच खातं आहे. त्यांच्या सद्विवेक बुद्धिला आपण विचारलं तर सुरुवातीला त्यांनी अप्रत्यक्ष निवडणुकीचा निर्णय घेतला. आता पुन्हा हा निर्णय थेट निवडणुकीचा होतोया. यातून एक संदेश जातोय की मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे. मंत्रिमंडळात कुणीतरी बॅक सीटवरून ड्रायव्हिंग करतंय”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Published on: Aug 22, 2022 03:27 PM