Sonia Gadhi : सोनिया गांधी आज ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत, लिखित स्वरुपात म्हणणं मांडणार
“भाजपकडे ईडी,पोलिस, लाठ्याकाठ्या, गोळ्या अपप्रचाराची भाषा, पण आमच्यासोबत संविधान आहे, सत्य, साहस, संयम आणि जनता”, असं ट्विट काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलंय. तर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येतंय.
मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gadhi) यांची आज ईडीकडून चौकशी (ED Enquiry) होत आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या घशाला त्रास होत असल्यानं त्या लिखित स्वरुपात म्हणणं मांडणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे आज काँग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलनं केली जात आहे. “सोनिया गांधी यांची चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे. केंद्र सरकारच्या या जुलूमी, अत्याचारी व हुकूमशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलोय”, असं काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येतंय. आज मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. तर काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपवर निशाणा साधण्यात येतोय. “भाजपकडे ईडी,पोलिस, लाठ्याकाठ्या, गोळ्या अपप्रचाराची भाषा, पण आमच्यासोबत संविधान आहे, सत्य, साहस, संयम आणि जनता”, असं ट्विट काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलंय. तर काँग्रेसच्या या आंदोलनांवर भाजपकडूनही हल्लाबोल करण्यात येतोय.