रशिया आणि युक्रेनची बेलारुसमध्ये थोड्याच वेळात बैठक
युरोपमध्ये एक भीषण युद्ध सुरु आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशाने रशियाने युक्रेनवर हल्ला केला. मागच्या आठवड्यात या युद्धाची सुरुवात झाली.
मॉस्को: युरोपमध्ये एक भीषण युद्ध सुरु आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशाने रशियाने युक्रेनवर हल्ला केला. मागच्या आठवड्यात या युद्धाची सुरुवात झाली. दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता आणि भयावहता वाढत चालली आहे. हे युद्ध थांबवण्यासंदर्भात बेलारुसमध्ये रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळामध्ये थोड्याचवेळात एका महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात होईल, या बैठकीच्या यशावर पुढचं चित्र अवलंबून असेल.