‘राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं जातंय यावरून अरविंद सावंत आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता लक्षात येत आहे. म्हणजे मुंबादेवी येथील प्रत्येक महिला ही माल आहे?’ असा आक्रमक सवाल शायना एनसी यांनी करत उबाठावर एकच हल्लाबोल केला. यानंतर आता अरविंद सावंत यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. “50 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत माझ्या क्षेत्रात माझ्या इतका स्त्रियांचा बहुमान करणारा माणूस तुम्हाला मिळणार नाही. मी माझ्या आयुष्यात कधीच कोणाबद्दल अवमानकारक शब्द वापरत नाही. ते हिंदीतल वक्तव्य होतं. माल या शब्दाचा इंग्रजीत अर्थ Goods असा होतो. मराठीत तुम्ही त्याचा काहीही अर्थ काढू शकता”, असं सावंत म्हणाले तर पुढे ते असेही म्हणाले, “शायना एनसी माझी जुनी मैत्रीण आहे, शत्रु नाही. फॉर्म भरल्यानंतर त्या आता दोन दिवसांनी बोलत आहेत. त्यांना हे नरेटिव्ह सेट करायला कोणी शिकवलं. मी त्यांनाच नाही, माझ्या उमेदवाराला सुद्धा बोललो, हा ओरिजनल माल आहे. हे लक्षात घ्या, अर्धवट बोलू नका. माल या शब्दाचा अर्थ वेगळा काढण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, त्यात त्या यशस्वी होणार नाहीत.”