गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी खूशखबर, काय आहे आनंदाची बातमी?
VIDEO | यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास होणार अधिक सोयिस्कर, काय आहे आनंदाची बातमी?
मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. मुंबईत नोकरी किंवा कामानिमित्त अनेक कोकणातील लोक वास्तव्यास आहे. मात्र हे कोकणवासिय गणेशोत्सवानिमित्त न चुकता आपल्या मुळ गावी जात असतात. कोकणात गणेशोत्सवाकरता जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अनेकांना रेल्वेने प्रवास करताना त्रास होतो. मात्र यावेळी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी खूशखबर आहे. कारण, मुंबई ते कुडाळ १८ अनारक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून मुंबई ते कुडाळदरम्यान विशेष १८ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गणेशोत्सवानिमित्त २०८ विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे जाहीर केले होते. सोबतच पश्चिम रेल्वेने ४० विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी एकूण २६६ विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत.