लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना कानमंत्र

| Updated on: Mar 11, 2024 | 12:04 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक प्रसिद्धी समितीतील प्रवक्ते, नेते आणि कार्यकर्त्यांना विशेष सल्ला देण्यात आला आहे. तुम्हाला उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, त्याची उत्तर देताना सावधगिरी बाळगा...

मुंबई, ११ मार्च २०२४ : देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. अशातच भाजपकडून आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यात आलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक प्रसिद्धी समितीतील प्रवक्ते, नेते आणि कार्यकर्त्यांना विशेष सल्ला देण्यात आला आहे. तुम्हाला उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, त्याची उत्तर देताना सावधगिरी बाळगा… घाईघाईने उत्तरं देण्याच्या नादात नवा वाद निर्माण करू नका, चर्चेत बोलताना तुम्ही मांडणार असलेल्या मुद्द्यांचे पुरावे सोबत ठेवा, बोलताना देहबोली आत्मविश्वासंपूर्ण असायला हवी, कोणी पक्षाविरोधात बोलत असताना कोणत्याही प्रकारचे संतप्त भाव, नकारात्मक भाव चेहऱ्यावर येऊ देऊ नका, पक्षाच्या धोरणाविरोधात, भूमिकेविरोधात एकही शब्द तोंडून निघणार नाही याकडे लक्ष द्या आणि ऑफ द रेकॉर्ड बोलणं टाळा…मुद्द्याचं बोला… अशाप्रकारे भाजपकडून आपल्या कार्यकर्त्यांसह नेते, प्रवक्त्यांना कानमंत्र देण्यात आला आहे.

Published on: Mar 11, 2024 12:04 PM
लेकीसाठी बापाची फिल्डिंग? सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामतीच्या मैदानात
शरद पवारांचा हात ज्याच्यावर पडतो तो भस्म… शिवसेनेच्या मंत्र्यांची ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका