Ram Rahim | डेरा सच्चा सौदाच्या राम रहिमला जन्मठेप, पंचकुला सीबीआय कोर्टाचा निकाल
पंजाबमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना कोर्टानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलीय. सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.
पंजाबमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना कोर्टानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलीय. सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. बाबा राम रहीम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. विशेष म्हणजे कोर्टाने राम रहीम यांना 31 लाख तर इतर चार आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सीबीआयच्या स्पेशल कोर्टात गुरमीत राम रहीम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टात 8 ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आलं होतं. पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाकडून आज निकालाचं वाचन करण्यात आलं. त्याआधी हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच जिल्ह्यात कमल 144 लागू करण्यात आलं आहे.