Pankaja Munde : पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, जाहीर सभेतून काय केली घोषणा?

| Updated on: Nov 14, 2024 | 1:18 PM

दुष्काळातील आर्थिक संकटात सापडलेला पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार असल्याची माहिती काल पंकजा मुंडे यांनी दिली. यासंदर्भात बोलत असताना स्वतः पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये असलेल्या जाहीर सभेतून कारखान्याबाबत गुड न्यूज दिली. त्यानंतर आजपासून हा कारखाना सुरू होणार आहे.

पंकजा मुंडे यांनी भावासाठी खास गिफ्ट दिले आहे. पंकजा मुंडे वैद्यनाथ साखर कारखान्याचे रोलर पूजन करणार आहेत. काही कारणास्तव वैद्यनाथ साखर कारखाना अनेक दिवसांपासून बंद होता. अखेर हा कारखाना आजपासून सुरू होतोय. परळी विधानसभा मतदारसंघातील उजनी गावात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाऊ धनंजय मुंडे यांना हे खास गिफ्ट दिल्याचं जाहीर केल आहे. ‘मला एवढा त्रास झाला, माझा चांगला चालता बोलता कारखाना बंद पडला, ओटीएससाठी दहा वेळा बँकेच्या चकरा मारल्या, जिल्ह्यातील इतर कारखान्यांना पैसे मिळाले. मात्र माझाच कारखाना राहिला कारखान्यावर जप्ती आणण्यात आली. मात्र आता चांगल्या माणसाने कारखाना चालवण्याची तयारी दाखवली. कारखान्याचा धुराडा चालू करण्याचे वचन परळी मतदारसंघातील लोकांना दिले होते. माझ्या आईला देखील मी वचन दिले होते. कारखान्यातून धूर निघतो त्यावेळी बाबा जिवंत असल्यासारखं वाटतं असे भावनिक उद्गार पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून केलंय.

Published on: Nov 14, 2024 01:18 PM
Ajit Pawar : पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार की नाही? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्या, गुन्हा दाखल