‘ही दोस्ती तुटायची नाय…’, संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरात ठाकरे पिता-पुत्रांचा फोटो

| Updated on: May 31, 2023 | 3:31 PM

VIDEO | संजय राऊत यांच्या दिल्लीच्या घरात ठाकरे-राऊतांची 'वज्रमूठ', 'त्या' फोटोची चर्चा

नवीदिल्ली : उद्धव ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील अर्थात ठाकरे कुटुंबीयांचे संबंध आणि संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचे संबध साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. मात्र या संजय राऊत यांच्या दिल्लीत राहत्या घरी एक फोटो फ्रेम लावण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधू यांच्यासह स्वतः संजय राऊत देखील यामध्ये दिसताय. या फोटोच्या वर एक कॅप्शन देण्यात आलेली दिसतेय. ती म्हणजे ही दोस्ती तुटायची नाय…थोडक्यात संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरात असणारा हा विशेष फोटो चर्चा विषय ठरतोय. कारण ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचा सूचक इशारा यामधून दिसतोय. संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी अनेक नेते भेटीगाठी घेण्यासाठी येत असतात. दरम्यान, या फोटोतून संजय राऊत कोणत्याही परिस्थित उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे दिसतेय. कारण त्यात घट्ट वज्रमूठ देखील पाहायला मिळत आहे.

Published on: May 31, 2023 03:31 PM
182 गावांची प्रतिक्षा 53 वर्षांनी थांबणार? पायला पाणी आणि किमान 70 हजार हेक्टर जमीनीवर पिकही डोलणार, निळवंडे धरणाच्या उद्घाटनाचा मुहूर्त आज
‘एवढा मोठा स्फोट झाला तरी त्यांचं थंड झालंच नाही’, राऊत यांच्या त्या दाव्यावर कडू यांची खोचक प्रतिक्रिया