Special Report | शाहरुखच्या केकेआरच्या पार्टीतही ड्रग्ज?

| Updated on: Oct 05, 2021 | 9:00 PM

अभिनेत्री शर्लिन चोप्राने शाहरुख खानच्या आयपीएल फ्रँचायझी टीम केकेआरच्या पार्टीत अनेकांनी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप एका मुलाखतीत केला आहे. पण यात तिने कोणाचेही नाव जाहीर केले नाही. परंतु शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआर टीमचा थेट उल्लेख केला आहे. शर्लिनने ही मुलाखल तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. ही मुलाखत जुनी असली तरी आर्यन खानच्या अटकेनंतर ती मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबईतील एका क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे बॉलिवूडमधील मोठे ड्रग्ज रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेते शाहरुख खानच्या समर्थनार्थ उभे राहिले असून आर्यन खानबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. पण या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रोने शाहरुख खानविरोधातही अप्रत्यक्षरित्या ड्रग्ज घेतल्याचा मोठा आरोप केला आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने शाहरुख खानच्या आयपीएल फ्रँचायझी टीम केकेआरच्या पार्टीत अनेकांनी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप एका मुलाखतीत केला आहे. पण यात तिने कोणाचेही नाव जाहीर केले नाही. परंतु शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआर टीमचा थेट उल्लेख केला आहे. शर्लिनने ही मुलाखल तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. ही मुलाखत जुनी असली तरी आर्यन खानच्या अटकेनंतर ती मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल होत आहे.

Special Report | अमरावतीत DCC बँक निवडणूक निकालानंतर खिसेकापूमुळं राडा!
Special Report | लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 9 मृत्यू, लखीमपूर घटनेचा नवीन व्हिडीओ समोर