Special Report | देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नांवर अजित पवारांची उत्तरं
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला चांगलाच चिमटा काढला. ‘महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते कुठला ना कुठला मुद्दा काढून बहिष्कार घालत आहेत’, असं अजित पवार म्हणाले.

चहापानावर यापूर्वी सातत्याने बहिष्कार घातल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. प्रत्येक वेळी काही ना काही मुद्दा काढून बहिष्कार टाकायचा हे घडायला नको. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना पत्र लिहून निमंत्रण दिलं होतं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते कुठला ना कुठला मुद्दा काढून बहिष्कार टाकतात, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या अनेक प्रश्नांही या पत्रकार परिषदेत उत्तरं दिली.