Special Report | आरोप प्रत्यारोपांच्या फेरींनी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या
नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेली राजकीय टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता संपल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप नेते पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीष महाजन यांच्यातील टीका चांगलीच चर्चेचा विषय ठरली. तर तिकडे कवठे महांकाळमध्ये रोहित पाटील यांनी आर. आर. आबांचं नाव घेत मतदारांना साद घातल्याचं पाहायला मिळालं.

बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमातील भाषणात त्या म्हणाल्या, तुमच्या ताई जेव्हा निवडून आल्या, मंत्री झाल्या. तेव्हा त्या पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. असं 32 व्या नंबरवर त्या कधी गेल्या नाही.’ उत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचा 32 क्रमांक लागल्यामुळे पंकजा मुंडे यांनी ही टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी प्रचारसभेत दिलेल्या आश्वासनांवरही त्यांनी तोंडसुख घेतले.
पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ 2019 मध्ये तुम्ही महिला व बालविकास मंत्री होत्या, ग्रामविकास मंत्री होत्या, महाराष्ट्राच्या नेत्या होतात, तेव्हा विधानसभा निवडणुकीत परळीतील जनतेनी तुम्हाला तुमची औकात दाखवली आहे. माझी 500 कोटी रुपये आणण्याची औकात आहे, नगदी हिशेब देऊ का?’ असा सवालही धनंजय मुंडे यांनी केली.