Special Report | Ameya Khopkar Vs Amol Mitkari पुन्हा एकदा खडाखडी-tv9

| Updated on: Mar 22, 2022 | 10:19 PM

तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती.“तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणाले होते. यानंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत. राज्य सरकारच्यावतीनं 19 फेब्रुवारी 1630 ही जन्मतारिख निश्चित करण्यात आली आहे. राज्यात 19 फेब्रवारी आणि तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यात येते. तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती.“तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणाले होते. यानंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे. अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं म्हटलंय. तर, अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करुन खोपकर यांना प्रत्युत्तर दिलंय.

Special Report | EDच्या रडारवर Rashmi Thackeray यांचा भाऊ!-tv9
भाजप आमदारांच्या मागणीमुळे अकृषिक कर रद्द झाला : Ashish Shelar