Special Report | शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘खंजीर’वॉर?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठीत खंजिर खुपसण्याचं वक्तव्य केल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाही, असं विधान केलं आहे. गीते यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठीत खंजिर खुपसण्याचं वक्तव्य केल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाही, असं विधान केलं आहे. गीते यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केला आहे. महाविकास आघाडी झाली तेव्हा अनंत गीतेंनी पवारांच्या पायाला हात लावला होता. पवारांच्या पाया पडले होते. आणि आघाडी केल्याबद्दल आभारही मानले होते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे.
अनंत गीते यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीते यांच्या आरोपाचा समाचार घेतला. अनंत गीते दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही. परंतु, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना अतिशय वाकून नम्रपणे पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले. या घटनेचा मी साक्षीदार आहे, असं तटकरे यांनी सांगितलं. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरु असल्याचं दिसून येत आहे.