Special Report | आर्यन खान ते अंडरवर्ल्ड…. मलिक प्रकरणात काय-काय झालं ?

| Updated on: Feb 23, 2022 | 11:34 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे प्रकरण माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकाऱ्यांसह भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचवेळी मलिक यांचं दाऊद कनेक्शन असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण समजून घेणं गरजेचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी ईडीने मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर मलिक यांच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत मलिक हेच पीडित असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हे प्रकरण अधिक खोलवर जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे प्रकरण माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकाऱ्यांसह भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचवेळी मलिक यांचं दाऊद कनेक्शन असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण समजून घेणं गरजेचं आहे.

Special Report | नवाब मलिक यांना अटक!…आता पुढचा नंबर कुणाचा ?
नवाब मलिक यांची अटक ही दुर्देवी