Special Report | अनिल परब हे पडद्यामागचे गृहमंत्री?
परब यांची एक व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे. त्यावरुन राणे यांनी आता या प्रकरणात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर अनिल परब पोलिसांना सूचना देत होते. मग ते पडद्यामागचे गृहमंत्री आहेत का? असा सवालही विचारला जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना परब यांची गृहखात्यात ढवळाढवळ होत असल्याची तक्रार केल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा यांना जामीन मिळाला. मात्र, राज्य सरकारच्या या कारवाईनंतर नारायण राणे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबतची परब यांची एक व्हिडीओ क्लिपही समोर आली आहे. त्यावरुन राणे यांनी आता या प्रकरणात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर अनिल परब पोलिसांना सूचना देत होते. मग ते पडद्यामागचे गृहमंत्री आहेत का? असा सवालही विचारला जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना परब यांची गृहखात्यात ढवळाढवळ होत असल्याची तक्रार केल्याचं बोललं जात आहे.