Special Report | किरीट सोमय्यांच्या रडारवर आता कोण?
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर सहकारी साखर कारखान्याला किरीट सोमय्या यांनी भेट दिली, आणि हा साखर कारखाना कुणामुळे आजारी पडला हे लवकरच समोर येईल असं सांगितलं. या कारखान्याबाबत ईडीने जोरदार तपास सुरु केला आहे, त्यामुळे लवकर यातून सत्य बाहेर येईल असं सोमय्या म्हणाले. यावेळी त्यांनी कारखान्याचे कामगार आणि शेतकऱ्यांकडून प्रकरणाची अधिक माहिती घेतली.
महाविकास आघाडी सरकारमधील आणखी 3 बड्या नेत्यांच्या घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत राज्य सरकारमधील मंत्री सोमय्यांच्या टार्गेटवर असणार आहे. राज्यातील सरकार हे गुंड आणि माफियांचं आहे म्हणत, त्यांचे ठेकेकार हे सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता अशा गैरव्यवहाराच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असल्याचा दावा सोमय्यांनी केला.