Special Report | किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता छगन भुजबळ!
भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांना आता भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय.

‘गेल्या चार पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले. ईडीला कळवलं. त्या प्रॉपर्टी अटॅच करायला लावल्या. आज दाखवलेली जमीन आहे ती नाशिकपासून 20 किमी लांब एक लहानसा रस्ता होता. त्यावेळेला 1980 मध्ये घेतलेली जमीन आहे. त्यांनी आज शिळ्या कडीलाच उत आणायचा प्रयत्न केला आहे. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरु आहे. त्या केसेसवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे की काय? मला माहिती नाही. आमच्या न्याय देवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कोर्टात लढत आहोत. त्यामुळे मी याबाबत जास्ती बोलणार नाही. एवढंच सांगेन की त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही’, असा दावा भूजबळांनी केलाय.