Special Report | पंकजा मुंडेंचा संघर्ष देवेंद्र फडणवीसांशी ?
आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा निरादार करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे यांना आपल्या समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. मुंबईतील वरळी निवासस्थानावर पंकजा मुंडेंनी खासदार प्रीतम मुंडेंना (Pritam Munde) मंत्रिपद न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काही सूचक विधाने केली तर काही रोखठोक भाष्य केलं. आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा निरादार करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.