Special Report | राजीनामे माघारी, पण मुंडेंचं पुढे काय होणार ?
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. पंकजा मुंडे यांच्या आवाहनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे मागे घेतले आहेत. पंकजा मुंडे यांच्या या भूमिकेचं स्वागत राज्यातील भाजप नेत्यांकडून केलं जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. पंकजा मुंडे यांच्या आवाहनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे मागे घेतले आहेत. पंकजा मुंडे यांच्या या भूमिकेचं स्वागत राज्यातील भाजप नेत्यांकडून केलं जात आहे. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी कोण कौरव आणि कोण पांडव हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील ठरवतील असं म्हटलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सावधगिरीचा इशारा देताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणार साधलाय.
Published on: Jul 14, 2021 11:51 PM