Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर 2 जळजळीत शाब्दिक वार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी जळजळीत टीका केलीय. त्यात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना ब्रिटीश अधिकारी रँडची उपमा दिलीय. दहीहंडी उत्सवाबाबत झालेल्या कारवाईवरुन देशपांडे यांनी ही टीका केली. तर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पाठीत खंजीर खुपसणारा म्हटलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी जळजळीत टीका केलीय. त्यात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना ब्रिटीश अधिकारी रँडची उपमा दिलीय. दहीहंडी उत्सवाबाबत झालेल्या कारवाईवरुन देशपांडे यांनी ही टीका केली. तर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पाठीत खंजीर खुपसणारा म्हटलंय. ‘पाठीत खंजिर खुपसणारं एकच नाव महाराष्ट्राच्या राजकारणात होतं. पण आता पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा समोर येतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवलाय’. पाटील यांच्या या टीकेमुळं शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.