Special Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध ?

| Updated on: Jan 28, 2022 | 11:02 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाना पटोलो विरुद्ध भाजप संघर्ष तीव्र झाला आहे. मोदींबाबत नाना पटोलेंनी आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. तर मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललोच नव्हतो असे नाना पटोले सांगत आहेत. मात्र आता भाजपने आणखी आक्रमक होत नाना पटोलेंना मनोरुग्णाचे औषध पाटवल्याने हा संघर्ष आणखी वाढला आहे. भाजपच्या या औषधाला नाना पोटेले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाना पटोलो विरुद्ध भाजप संघर्ष तीव्र झाला आहे. मोदींबाबत नाना पटोलेंनी आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. तर मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललोच नव्हतो असे नाना पटोले सांगत आहेत. मात्र आता भाजपने आणखी आक्रमक होत नाना पटोलेंना मनोरुग्णाचे औषध पाटवल्याने हा संघर्ष आणखी वाढला आहे. भाजपच्या या औषधाला नाना पोटेले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी गावगुंडाबद्दल बोललो आहे, भाजपवाल्यांना काय आदळ आपट करायची ती करूदे, कोर्टात तक्रारी करू द्या, कोर्ट जो निर्णय देईल त्याचा आदर राखू असे नाना पोटोले म्हणालेत, तसेच चंद्रकांत पाटलांचे औषध चुकीच्या पत्त्यावर गेलंय, ते कोल्हापूरला गेलं पाहिजे होतं, असा टोला चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

तसेच मी विधानसभा अध्यक्ष असतो तर काय केलं असतं हे देशाला दिसलं असतं. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने ठराव संमत केला की इतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ दिले नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. निवडणूक जवळ येते तेव्हा तेव्हा भाजपाकडून हिंदू मुस्लिम वाद वाढवण्याचे काम करतात. भाजप सरकारच्या काळात 53 टक्के बेरोजगारी वाढली आहे. अशी टीका नाना पटोलेंनी केलीय. बियर शॉपी रेशनच्या दुकानात सुरू करणे असो किंवा राज्यात डान्सबार सुरू करणे असो हेही निर्णय फडणवीसांच्या काळात घेतले गेले. अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

Special Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
Video | अंनिसमधील वाद चव्हाट्यावर, हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा आरोप