Special Report | भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार?
भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखण्यास सुरुवातही झालीय. भाजपच्या कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक आज संपली. त्या मुंबई महापालिका आणि अन्य मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं.
मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखण्यास सुरुवातही झालीय. भाजपच्या कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक आज संपली. त्या मुंबई महापालिका आणि अन्य मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला बाजूला करत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत बसलेल्या शिवसेनेला काटशह देण्यासाठी भाजपनं मुंबई महापालिकेसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे.