Special Report | आशिष शेलारांच्या विरोधात महिला शिवसैनिकांकडून तक्रार!
महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. आशिष शेलार यांनी महापौरांविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला ब्रिगेडनं केलाय. शिवसेनेच्या महिला आघाडीकडून मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. तर आशिष शेलार यांचे वाक्य तोडून ते पसरवले जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला आघाडीने केला आहे.

दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनीही आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जात जबाब नोंदवला. त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे वरळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणावरुन सुरु झालेला हा वाद आता अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तर दुसरीकडे शेलार यांनीही पेडणेकरांनी केलेली तक्रार पडताळून पाहण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे. ‘मी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून वस्तुस्थितीमध्ये फेरफार केल्याचा निषेध व्यक्त करत आणि सत्ताधारी पक्षाच्या घटकांकडून माझ्यावर खोटा खटला भरण्याच्या दबावाला विरोध केला आहे’, असं ट्विट करत शेलार यांनी पत्राबाबत माहिती दिलीय.