Special Report | केंद्राकडूनच Narayan Rane यांच्या बंगल्यावर कारवाईचं फर्मान?
शिवेसना आणि नारायण राणे यांच्या पुन्हा वाद पेटण्यास सुरुवात झाली. राणेंच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. यादरम्यान मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी नोटीस दिली.
मुंबई : भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा तापला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. यानंतर शिवेसना आणि नारायण राणे यांच्या पुन्हा वाद पेटण्यास सुरुवात झाली. राणेंच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. यादरम्यान मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी नोटीस दिली. मुंबई महापालिकेचे अधिकारी राणेंच्या घरी पोहोचले देखील होते. मात्र, जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्यानं ते पाहणी न निघून गेले होते. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. याला उत्तर देण्यासाठी पुन्हा शिवसेनेनं मुंबईतील अविघ्न इमारतीसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. शिवसेनेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवर नीलरत्न बंगल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. चिवला बीचवरील त्याच बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला भारत सरकारच्या एका संस्थेकडून देण्यात आले आहेत.