Special Report | Chandrakant Patil यांचा थेट मतदारांनाच ED चा इशारा? -Tv9
कोल्हापुरात सध्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर राज्यात ईडीच्या कारवाईचा सपाटा. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मतदारांनी जर कुणाकडून पैसे घेतले तर तुमच्यामागे ईडी लागले असा थेट इशारा दिलाय.
कोल्हापुरात सध्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर राज्यात ईडीच्या कारवाईचा सपाटा. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मतदारांनी जर कुणाकडून पैसे घेतले तर तुमच्यामागे ईडी लागले असा थेट इशारा दिलाय. त्यातच आज शरद पवार यांनी दिल्लीत मोदींची भेट घेतली आहे. मी वर्तमानपत्रं पाहिलं. चंद्रकांत पाटलांचं विधान होतं, तिथे पोटनिवडणूक लागल्या आहेत. आम्हाला मत नाही दिलं तर ईडी तुमच्या घरी येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांच्या ईडीच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेत्यांनी ईडीच्या आणि इनकम टॅक्सच्या चौकशा मागे तागतील, असे अनेकदा विधान केले आहे. आता चंद्रकांत पाटलांच्या विधानेने पुन्हा वाद निर्माण झाला आहे.