Special Report | मुंबईच्या चेंबूर परिसरात हिमवर्षाव ?
मुंबईत गारवा जाणवू लागला आहे. पण हिमवर्षाव व्हावा, इतकी काही परिस्थिती मुंबईत कधीच पाहण्यात आलेली नाही. अशातच स्नो-फॉल सारखा भास होईल, अशा प्रकारचा अनुभव शनिवारी रात्री चेंबूरमधील काही लोकांना आला. पण हा स्नो फॉल नसून पावडर-फॉल्ट असल्याचं अखेर समोर आलं. यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असं आवाहनही पोलिसांनी केलेलं आहे. दरम्यान, पावडर सदृश्य पावसाचे घटक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.

चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाणगावात एचपीसीएलच्या प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरली आहे. विशेष म्हणजे शनिवारी दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान ही पांढऱ्या रंगाची पावडरही भाविकांच्या जेवणात गेली. त्यामुळे इथल्या नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली होती. पावडरमुळे शरीरास धोका निर्माण होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली होती. गव्हाणगावातील रिक्षा, गाड्या आणि दुचाक्यांवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला होता. पण हा बर्फाचा थर नसून पावडर असल्याचं नंतर समोर आलं.