Special Report | गटारी निमित्त विरारमधल्या शिवसैनिकांची भन्नाट शक्कल
खास गटारी अमावस्यासाठी एका व्यक्तीला एक किलो चिकन अल्पदरात म्हणजे 180 रुपयाला देण्यात येईल असं बॅनर लावण्यात आलं आहे. रविवारी 8 ऑगस्टला विरार पूर्व साईनाथ नाका येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत हे चिकन वाटप करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे.
विरार पूर्वच्या साईनाथ नाक्यावर शिवसैनिकांनी लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहे. सध्या चिकनचे दर हे 230 ते 240 पर्यंत झाले आहेत. पण खास गटारी अमावस्यासाठी एका व्यक्तीला एक किलो चिकन अल्पदरात म्हणजे 180 रुपयाला देण्यात येईल असं बॅनर लावण्यात आलं आहे. रविवारी 8 ऑगस्टला विरार पूर्व साईनाथ नाका येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत हे चिकन वाटप करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. या बॅनरवर शिवसेनेचे वरिष्ठ आणि स्थानिक नेत्यांचे फोटोही लावले आहेत. त्यामुळे अल्पदरात देण्यात येणारे चिकन हे महापालिका निवडणुका लक्षात घेऊन, नागरिकांना आकर्षित तर करण्यासाठी नव्हे ना, अशा उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.