Special Report | चिपळूणमधील महापुराच्या व्यथेतील धाडसी कथा !

| Updated on: Jul 29, 2021 | 10:04 PM

एका छतावर एक व्यक्ती उभा असल्याचं कॅमेरात पाहायला मिळालं आणि तो व्यक्ती काहीतरी हातवारे करताना दिसून आलं. लक्षपूर्वक पाहिलं तर तो व्यक्ती मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या, अशी विनंती करत असल्याचं दिसत होतं.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हाहा:कार माजवला होता. अशावेळी चिपळूणमध्ये भल्या पहाटे वाशिष्टी नदीचं पाणी शिरलं आणि लोकं आहेत तिथे अडकून पडली. चिपळूणमध्ये जेव्हा टीव्ही 9 मराठीची टीम पोहोचली तेव्हा तिथलं चित्र अत्यंत विदारक होतं. त्याचच एका छतावर एक व्यक्ती उभा असल्याचं कॅमेरात पाहायला मिळालं आणि तो व्यक्ती काहीतरी हातवारे करताना दिसून आलं. लक्षपूर्वक पाहिलं तर तो व्यक्ती मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या, अशी विनंती करत असल्याचं दिसत होतं. मात्र, पुराच्या पाण्यामुळे त्याच्यापर्यंत जेवण देणं अशक्य होऊन बसलं होतं. याच व्यक्तीची कहाणी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Special Report | पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार ? कार्यकर्त्यांची इच्छा पंकजा पूर्ण करणार ?
Special Report | ‘स्विटी’साठी जीव धोक्यात