Special Report | क्लीनअप मार्शलची धुलाई का होतेय?
मिळालेल्या माहितीनुसार जुहू परिसरात काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरत होते. यावेळी मास्क न लावता नागरिक फिरत असल्यामुळे क्लिनअप मार्शलने त्यांना अवडले. तसेच कारवाई म्हणून त्यांना दंड देण्यास सांगितले. यावेळी नागरिक तसेच मार्शल यांच्यात वाद झाला. तसेच या वादाचे रुपांतर नंतर भांडणात झाले. नागरिक तसेच क्लीनअप मार्शल यांच्यात नंतर जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जुहू परिसरात क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करताना ही मारामारी झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार जुहू परिसरात काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरत होते. यावेळी मास्क न लावता नागरिक फिरत असल्यामुळे क्लिनअप मार्शलने त्यांना अवडले. तसेच कारवाई म्हणून त्यांना दंड देण्यास सांगितले. यावेळी नागरिक तसेच मार्शल यांच्यात वाद झाला. तसेच या वादाचे रुपांतर नंतर भांडणात झाले. नागरिक तसेच क्लीनअप मार्शल यांच्यात नंतर जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.