Special Report | वारकरी जेलमध्ये, मुख्यमंत्री पंढरपुरात; विठ्ठलाच्या महापूजेवरून विरोधकांची टीका
खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई ते पंढरपूर प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्वत: ड्रायव्हिंग केलं.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्निक, मानाच्या वारकऱ्यांसह आज विठ्ठलाची महापूजा केली. महापूजेसाठी मुख्यमंत्री सोमवारी मुंबईवरुन पंढरपूरला रस्ते मार्गानं आहे. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई ते पंढरपूर प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्वत: ड्रायव्हिंग केलं. त्याच्या बातम्याही सर्वच माध्यमांनी दाखवल्या. मुख्यमंत्र्यांच्या या ड्रायव्हिंगवर भाजपसह अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनीही जोरदार टोलेबाजी केलीय.