Special Report | राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पत्रातून शाब्दिक चकमक!

| Updated on: Sep 21, 2021 | 10:02 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पुन्हा एकदा पत्र संघर्ष पाहायला मिळत आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं सांगत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्यपाल कोश्यारी यांनी पत्राद्वारे केली होती. आता राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या पत्राद्वारे संसदेचं चार दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीच मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पुन्हा एकदा पत्र संघर्ष पाहायला मिळत आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं सांगत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्यपाल कोश्यारी यांनी पत्राद्वारे केली होती. आता राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या पत्राद्वारे संसदेचं चार दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीच मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केलीय. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावरुन भाजप नेते चांगेलच आक्रमक झाले आहेत. .

दरम्यान, ‘साकीनाक्यातील घटनेने माननीय राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी माननीय राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल महोदयांच्या पत्राला उत्तर दिलंय.

Special Report | अनिल परबांच्या कुंडलीचा ज्योतिषी सेनेतच?
Sharad Pawar UNCUT | “शरद पवार यांनी मांडला क्रिकेटचा संपूर्ण इतिहास”