Special Report | ‘सामना’तून काँग्रेसवर टीका; नाना पटोले, संजय राऊत यांच्यात जुंपली
आम्हाला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नाना पटोलेंनी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ‘सामना’ दैनिकातून काँग्रेसच्या स्थितीबाबत केलेल्या भाष्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. नाना पटोले म्हणाले, “सामनावर मी कोणती ही प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हला एकदा करावा लागेल” आम्हाला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नाना पटोलेंनी दिला.