Special Report | पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वरील निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वरील निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. पुणे जिल्ह्यात 74 टक्के लोकाचं लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. लोकांना विनंती आहे की कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय. तसंच पुणे शहरात पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात 3 हजार 950 सक्रीय रुग्ण आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 4 टक्के लसीकरण झालं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.