Special Report | तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा, नागपुरात लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित
नागपूरमध्ये एक दिलासायक बाब समोर आली आहे. नागपूरमध्ये कोरोना लसीच्या चाचणीसाठी निवड झालेल्या शहरातील 18 टक्के मुलांमध्ये कोरोना विषाणूविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यविषयक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये एक दिलासायक बाब समोर आली आहे. नागपूरमध्ये कोरोना लसीच्या चाचणीसाठी निवड झालेल्या शहरातील 18 टक्के मुलांमध्ये कोरोना विषाणूविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना लसीच्या चाचण्यांसाठी 12 ते 18 वयोगटातील मुलांची निवड करताना ही बाब निदर्शनास आलीय.