Special Report | ‘अच्छे दिन’ वरून उपमुख्यमंत्री अजित पवार बरसले!
ट्रोलने शंभरी पार केलीय, तर एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. हे पंतप्रधान मोदींनी सांगितलेले अच्छे दिन असावेत असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मग अजितदादांवर पलटवार केलाय.
देशात पुन्हा एकदा महागाईचे चकटे बसत आहेत. इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसतेय. पेट्रोलने शंभरी पार केलीय, तर एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. हे पंतप्रधान मोदींनी सांगितलेले अच्छे दिन असावेत असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मग अजितदादांवर पलटवार केलाय. आमदार अतुल भातखळकर यांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.